श्री रामवरदायिनी - परिचय
कृष्णा नदीच्या काठी वसलेला व महाबळेश्वर हे निर्सगरम्य ठिकाण असलेला सातारा जिल्हा हा खरोखरच निसर्ग संपदेने नटलेला जिल्हा असून जिल्ह्यात महाबळेश्वर-पाचगणीपासून ते वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा असलेले कास पुष्पपठार आदी पर्यटनस्थळे आहेत. कास पठार म्हणजे सातारा जिल्ह्याची एक ओळखचं... याच वैशिष्ट्यपूर्ण कास पठारावरील फुलांचं संवर्धन करण्यासाठी वनविभागानं पाऊल उचलली आहेत. फुलांच्या संवर्धनासोबत पर्यटन व्यवसाय वाढीस लागावा, यासाठी स्थानिकांना गाईडचं प्रशिक्षण देण्यात येतंय. त्यामुळे आता इथं येणाऱ्या पर्यटकांच्या ज्ञानात आणखी भर पडत आहे.
साता-यात समर्थ रामदासांची समाधी आहे. देशासाठी बलीदान देणा-या सैनिकांपैकी सर्वात जास्त सैनिक सातारा जिल्हयातील आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी याच जिल्हयातून आपल्या शिक्षण कार्याला सुरुवात केली. याच जिल्ह्याने यशवंतराव चव्हाण यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिले मुख्यमंत्री दिले.
जिल्हयाचे हवामान थंड व आल्हाददायक आहे कारण जिल्ह्याच्या पश्र्चिम भागात सह्याद्रीचे डोंगर आहेत. कृष्णा, कोयना, नीरा, वेण्णा, उरमोडी, तारळा, माणगंगा या जिल्ह्यातील महत्त्वाच्या नद्या आहेत. महाबळेश्र्वर तालुक्यातील क्षेत्र महाबळेश्र्वर येथून कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री व सावित्री या पाच नद्यांचा उगम झालेला आहे.
जिल्हयाचे हवामान थंड व आल्हाददायक आहे कारण जिल्ह्याच्या पश्र्चिम भागात सह्याद्रीचे डोंगर आहेत. कृष्णा, कोयना, नीरा, वेण्णा, उरमोडी, तारळा, माणगंगा या जिल्ह्यातील महत्त्वाच्या नद्या आहेत. महाबळेश्र्वर तालुक्यातील क्षेत्र महाबळेश्र्वर येथून कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री व सावित्री या पाच नद्यांचा उगम झालेला आहे.
महाराष्ट्राभिमान जागवणा-या, छत्रपती शिवाजी राजांच्या हिंदवी स्वराज्यास अनुकूल पार्श्र्वभूमी तयार करणाचे सामर्थ साता-याच्या भूमितच होते, तसेच प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल असा प्रतापगडाशी जोडलेला इतिहास सर्वज्ञात आहेच. प्रतापगड सातारा जिल्हयातील महाबळेश्र्वर तालुक्यात असून शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारी अफझलखानाची कबर येथे आहे.
प्रतापगडाच्या पायथ्याला संपूर्ण पर्यावरणाच्या सानिध्यात वसलेल्या पारसोंडगाव (पार्वतीपूर) येथे श्री रामवरदायिनी देवीचे हे पुरातन काळातील मंदिर आहे. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची यशस्वी स्वप्न याच पावन भूमित पाहीली व प्रतापगडासारखा मजबूत किल्ला याठिकाणी बांधला. श्री रामवरदायिनी देवीच्य जुन्या मंदिराची पुर्नबांधणी केलेली आहे जुने मंदिर संपूर्ण लाकडात बांधकाम केलेले होते.
Sri Ramvardhayani, the deity at the temple at Parsond
[Copyright with the original photographer]
श्री रामवरदायिनी देवीचा पूर्व इतिहास रामायण कालातील आहे. अशी अख्यायीका आहे, गोष्ट अशी आहे की, श्रीराम वनवासात असताना रावणाने सीतामाईचे जेव्हा अपहरण केले त्यावेळी प्रभुरामचंद्र सीता माईचा शोध घेण्यासाठी या रानावनात भटकू लागले व वृक्ष-वल्लीनां पशु-पक्षांना “सीतेला कुठे पाहिले का?” असे विचारत वेडयासारखे सैरावैरा फिरत होते त्यावेळी आदिशक्ती देवी पार्वतीनी महादेवांना विचारले “श्रीराम हे स्वता: एक महान अवतार असताना सर्वसामान्य माणसारखे का वागत आहेत त्यांच्यावर रयतेची जबाबदारी आहे, असे वेडयासारखे वागणे त्यांना बरे दिसत नाही.” महादेव त्यावेळी देवी पार्वतीला म्हणतात “श्रीराम हा देवाचा महान अवतार असला तरी आत्ता ते मणूश्य रुपात आहेत त्यामुळे ते आपल्या पत्नीच्या विरहाने व्याकूळ आहेत व त्यांचे त्यांच्या पत्नीवर खूप प्रेम आहे.” म्हणून देवी पार्वती श्रीरामाची परिक्षा घेण्यासाठी माता सीताचे रुप घेऊन श्रीरामाच्या समोर जातात. परंतू श्रीराम देवी पार्वतीला ओळखून त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन म्हणतात “हे माते मी तुम्हाला ओळखले आहे का माझी परीक्षा पाहत आहात?” हे पाहून माता पार्वती प्रसन्न होऊन श्रीराम यांना वर देतात की, “ हे श्रीराम तुम्ही तुमच्या कार्यात यशस्वी होताल व तुम्हाला तुमची पत्नी सीता लवकरच भेटेल.” म्हणून आदिशक्ती देवी पार्वतीचे श्री रामवरदायिनी हे नाव पार्वतीपूर, पारसोंडगाव येथे प्रसिध्द झाले.
श्री रामवरदायिनी देवीचे मुख्य स्थान गावातील देवळापासून 1 कि. मी. जंगलात उंचावर वरच्या बाजूल आहे. त्याठिकाणाला मेटा असे म्हणतात. देवीचा उत्सव नवरात्रीला आसतो. यात्रोत्सव दर वर्षी चैत्रअमावस्या ते वैशाख षष्टी या कालावधीत साजरा केला जातो या वेळेस भाविक मेटा या ठिकाणी श्री रामवरदायिनी देवीचे दर्शन व पूजा करण्यासाठी जातात. देवीची पुजा जंगम लोक करत असतात. देवीला गोडाचाच नैवेदय दाखवला जातो.
Shri Ramvardhayani Temple - Parsond Village, Mahabaleshwar Taluka,
Satara District, Maharashtra
[Photograph by Aparna Kondhare]
आत्ताच्या जंगलापेक्षा पुर्वी मंदिराभोवती घनदाट जंगल होते. कुठलेही वाहन मदिरापंर्यन्त येत नव्हते मुख्य रस्ता जवळ जवळ 4 किलोमिटर आहे तेथे एसटीने उतरुन मदिरापर्यन्त चालत यावे लागत असे तेथून मंदिरापर्यन्त येण्यासाठी कच्ची पायवाट आहे हा रस्ता घनदाट जंगलातून जातो दिवसासुध्दा एकटया माणसाला येथून जाण्यायेण्यासाठी भीती वाटत असे, परंतु आत्ता रस्ता सुधारण्याची कामे चालू आहेत. भाविकांची ये - जा सुध्दा चालू असते.
आत्ता ब-याच भाविकांनि विकासाची कामे हाती घेतल्यामुळे गावाचा पूर्ण कायापालट झाला आहे. प्रेक्षणीय स्थळ, तिर्थक्षेत्र म्हणून नावारुपाला आलेल्या आदिशक्ती श्री रामवरदायिनी देवीच्या या स्थळाला भेट देण्यासाठी पर्यटक येत असतात. त्यामुळे जवळ जवळ ब-याच मुलभूत सोयी करण्यात आलेल्या आहेत.विकास कामे आजून चालूच आहेत.


No comments:
Post a Comment